
1. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 ऑगस्टपासून भारतीय उत्पादनांवर 25% टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे.
2. यामुळे भारतीय शेअर बाजारात 1-2% घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
3. ट्रंप यांच्या टॅरिफमुळे भारतीय औषध निर्यात क्षेत्राला मोठा फटका बसू शकतो.
Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 ऑगस्टपासून भारतातून येणाऱ्या उत्पादनांवर 25 टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याची घोषणा केली आहे. यासोबतच त्यांनी भारताला रशियाकडून होणाऱ्या इंधन आयातीवरही दंडात्मक शुल्क लावण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या घोषणेनंतर गुजरातच्या GIFT सिटीमधील निफ्टी डेरिव्हेटिव्ह व्यवहारात अर्धा टक्क्यांहून अधिक घट झाली. बाजार विश्लेषकांच्या मते, शेअर बाजार 1 ते 2 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो.