SEBI Bans: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनो सावधान! सेबीने 'या' 4 कंपन्यांवर घातली बंदी, तुमचे पैसे...

सेबीने रोखे बाजारातील चार संस्थांवर सहा महिन्यांसाठी बंदी घातली आहे. याचा मोठा परिणाम गुंतवणूकदारांवर होणार आहे.
SEBI Bans 4 Entities
SEBI Bans 4 EntitiesSakal

SEBI Bans 4 Entities: बाजार नियामक सेबी (SEBI) ने शुक्रवारी गुंतवणूक सल्ला सेवा पुरवणाऱ्या चार कंपन्यांवर 6 महिन्यांसाठी बंदी घातली आहे. यासोबतच या कंपन्यांना सेवांद्वारे गुंतवणूकदारांकडून वसूल केलेली रक्कम तीन महिन्यांत परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सेबीने कोर्स वर्क फोकस आणि त्याचे मालक शशांक हिरवाणी, कॅपिटल रिसर्च आणि त्याचे मालक गोपाल गुप्ता, कॅपर्स आणि त्याचे मालक राहुल पटेल यांना सिक्युरिटीज मार्केटमध्ये सहा महिन्यांसाठी बंदी घातली आहे.

दोन वेगळ्या आदेशांमध्ये, SEBI ला त्यांच्या तपासणीत आढळले की या कंपन्या गुंतवणूक सल्लागार म्हणून नोंदणी न करता अनधिकृत गुंतवणूक सल्लागार सेवांमध्ये गुंतल्या आहेत.

कंपन्यांनी नियमांकडे दुर्लक्ष केले :

मार्केट रेग्युलेटर SEBI च्या मते, कोर्स वर्क फोकस आणि हिरवाणी यांनी मार्च 2018 ते जुलै 2020 या कालावधीत गुंतवणूकदारांकडून एकत्रितपणे 96 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली होती.

गुप्ता आणि पटेल यांनी मिळून जून 2014 ते नोव्हेंबर 2019 दरम्यान गुंतवणूकदारांकडून 60.84 लाख रुपये उभे केले.

सेबीने बुधवारी पारित केलेल्या अंतिम आदेशात म्हटले आहे की अशा कृतींद्वारे कंपन्यांनी Investment Adviser (गुंतवणूक सल्लागार) नियमांचे उल्लंघन केले आहे. सेबीने आपल्या आदेशात कंपन्यांना अशा सेवांसाठी भरलेले गुंतवणूकदारांचे पैसे तीन महिन्यांच्या आत परत करण्याचे निर्देश दिले आहेत.

SEBI Bans 4 Entities
Gold Investment: जगात सर्वाधिक सोने कोण खरेदी करत आहे आणि का? जाणून घ्या

सेबीचे अधिकार :

सेबीची स्थापना 12 एप्रिल 1992 रोजी एक वैधानिक नियामक संस्था म्हणून करण्यात आली. ती भारतीय भांडवल आणि रोखे बाजाराची देखरेख आणि नियमन करते आणि नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार करते, ज्याचा उद्देश हा गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे हा असतो.

सेबीचे मुख्य कार्यालय वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथे आहे. तसेच तिची नवी दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि अहमदाबाद या शहरांमध्ये प्रादेशिक कार्यालये आहेत आणि बंगळुरू, जयपूर, गुवाहाटी, पाटणा, कोची आणि चंदीगडसह अधिक शहरांमध्ये स्थानिक कार्यालये आहेत.

SEBI Bans 4 Entities
सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com