

NPCI MDR Decision Triggers Rally in Paytm, MobiKwik Shares; Know the Reason
eSakal
UPI पेमेंटबाबत NPCIने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे बुधवारी शेअर बाजाराची सुरुवात होताच Paytm आणि MobiKwikशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. 15 ऑक्टोबरपासून 2 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यापारी व्यवहारांवर 0.4 टक्क्यांपर्यंत Merchant Discount Rate (MDR) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयानंतर Paytmची मूळ कंपनी असलेल्या One 97 Communicationsचा शेअर सुमारे 4 टक्क्यांनी वाढून 1,810 रुपयांपर्यंत पोहोचला. त्याचवेळी One MobiKwik Systemsच्या शेअरमध्येही 4.70 टक्क्यांची वाढ झाली आणि तो 210.32 रुपयांवर व्यवहार करत होता.