
Berkshire Hathaway Stock: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे आणि अमेरिका मंदीत जाण्याच्या भीतीमुळे अमेरिकेसह जगभरातील शेअर बाजारात घसरण होत आहे. यामुळे जगातील अनेक आघाडीच्या गुंतवणूकदारांच्या संपत्तीत घट झाली आहे. परंतु, वॉरन बफे हे अशा गुंतवणूकदारांपैकी आहेत ज्यांची संपत्ती 2025 मध्ये वाढली आहे.
त्यांची संपत्ती 21 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश इंडेक्समध्ये समाविष्ट असलेल्या टॉप 500 अब्जाधीशांमध्ये बफेंच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे.