
गणेश चतुर्थीनंतरच्या पहिल्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली.
सेन्सेक्स तब्बल 600अंकांनी, तर निफ्टी 173 अंकांनी खाली आला.
आयटी व बँकिंग क्षेत्रातील विक्रीमुळे दबाव वाढला असून अमेरिकन टॅरिफचाही बाजारावर परिणाम होत आहे.
Stock Market Opening Today: गणेश चतुर्थीच्या सुट्टीनंतर दलाल स्ट्रीट पुन्हा सुरू झाला आणि बाजार उघडताच घसरला. व्यवहाराच्या सुरुवातीपासूनच विक्रीचा दबाव दिसून आला आणि गुंतवणूकदारांचे करोडोंचे नुकसान झाले.
बीएसई सेन्सेक्स 605.97 अंकांनी घसरून 80,180.57 वर आला, तर एनएसई निफ्टी 173.50 अंकांनी घसरून 24,538.55 वर पोहोचला. दोन्ही निर्देशांकांत सतत घसरण दिसून आली.