
Stock Market Opening Today: शुक्रवारी (13 जून) देशांतर्गत शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात झाली. इस्रायलने इराणवर मोठा हल्ला केला आहे, त्यानंतर सेन्सेक्स 1,000 अंकांनी घसरला. निफ्टी देखील 340 अंकांनी घसरला. बँक निफ्टी सुमारे 700 अंकांनी घसरला.
मागील बंदच्या तुलनेत सुरुवातीच्या आकड्यांवर नजर टाकल्यास, सेन्सेक्स 1264 अंकांनी घसरून 80,427 वर उघडला. निफ्टी 415 अंकांनी घसरून 24,473 वर उघडला. बँक निफ्टी 933 अंकांनी घसरून 55,149 वर उघडला.