
Why Stock Market Crash Today: गुरूवार 28 नोव्हेंबर रोजी शेअर बाजार झपाट्याने घसरला आहे. सेन्सेक्स 950 अंकांनी खाली गेला आहे. निफ्टी सुमारे 1 टक्क्यांनी घसरला आणि 24,050 च्या खाली गेला. ही घसरण आयटी आणि वाहन कंपन्यांच्या शेअर्समुळे झाली.
इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा, टेक महिंद्रा आणि टीसीएसचे शेअर्स 2 टक्क्यांहून अधिक घसरले. बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.05 टक्क्यांच्या वाढीसह आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.63 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होते.