

Why Stock Market Down Today: आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे 13 जानेवारीला आज भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह उघडले. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 800 अंकांनी घसरून 76,580.57 वर आला, तर निफ्टी 246.35 अंकांनी घसरून 23,185.15 वर आला.
PSU बँका आणि रिअल इस्टेट शेअर्सना सर्वाधिक फटका बसल्याने सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात होते. कमकुवत जागतिक संकेतांनीही शेअर बाजाराचा मूड खराब करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आज बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे 4.53 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.