
Tata Motors Stock Price Today : आजच्या व्यवहारात ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. कमकुवत निकालांमुळे आज शेअर 9 टक्क्यांनी घसरून 683 रुपयांवर आला आहे. याआधी बुधवारी तो 753 रुपयांवर बंद झाला होता.
Jaguar Land Rover (JLR) च्या कमकुवत कामगिरीमुळे डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 22 टक्क्यांनी घट झाली आहे. निकालानंतर, ब्रोकरेज हाऊसने देखील स्टॉकबद्दल सतर्क रहा असे सांगितले आहे.