
TCS Stock Falls: देशातील आघाडीची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (TCS) शेअरमध्ये आज घसरण पाहायला मिळाली. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी BSE वर कंपनीचा शेअर 2.4 टक्क्यांनी घसरून 3,300 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. ही घसरण TCS च्या पहिल्या तिमाही निकालानंतर झाली आहे. हे निकाल बाजाराच्या अपेक्षेपेक्षा चांगले असले तरी गुंतवणूकदारांनी याला नकारात्मक प्रतिसाद दिला आहे.