
Warren Buffett Investment Tips: शेअर बाजारातील दिग्गज वॉरेन बफे यांनी वयाच्या 94व्या वर्षी बर्कशायर हॅथवेचे सीईओ पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बफे या वर्षाच्या अखेरीस अब्जावधी डॉलर्सच्या कंपनीची सूत्रे ग्रेग एबेल यांच्याकडे सोपवतील. एबेल सध्या कंपनीचे उपाध्यक्ष आहेत. ते जवळजवळ 60 वर्षे या कंपनीचे सीईओ राहिले आणि एका बुडत्या कंपनीला 1.16 ट्रिलियन डॉलर्सची कंपनी बनवली.