
Robert Kiyosaki On Recession: रिच डॅड पूअर डॅड पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी पुन्हा एकदा जागतिक अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी जग मंदीच्या छायेत आहे असे सांगितले आहे. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी स्पष्ट केले की, 2012 मध्ये Rich Dad’s Prophecy लिहिल्यापासून ते लोकांना वारंवार सावध करत आले आहेत.