
Zerodha's Nithin Kamath: सध्या सुरू असलेल्या शेअर बाजारातील घसरणीमुळे ब्रोकिंग उद्योगावर मोठा परिणाम होत आहे, असे झेरोधाचे सह-संस्थापक नितीन कामत यांनी सांगितले. नितीन कामत यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले की, मला कल्पना नाही की शेअर बाजार भविष्यात कुठे जाणार आहे, पण ब्रोकिंग उद्योगाबद्दल मी सांगू शकतो. सध्या ट्रेडरची संख्या आणि ट्रेडिंग व्हॉल्यूम दोन्ही मोठ्या प्रमाणात घसरताना दिसत आहेत.