
प्रसाद भागवत -
नुकतीच एका प्रख्यात ऑनलाइन ब्रोकरने म्युच्युअल फंड युनिट फक्त डी-मॅट स्वरूपात मिळतील, अशी घोषणा केली. या पार्श्वभूमीवर छोट्या गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांचा फोलिओ डीमटेरियलाइज्ड (डी-मॅट) स्वरूपात ठेवावा का? यावर चर्चा सुरू झाली. आपल्या सर्व गुंतवणुकीची माहिती ‘ऑनलाइन’ हवी आणि आपली सर्व गुंतवणूक एकत्रित स्वरूपात दिसावी, या दोन मोठ्या कारणांसाठी अनेक गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड डी-मॅट स्वरूपात घेण्याकडे मोर्चा वळवला.