

Silver Investment Guide 2026
sakal
डॉ. वीरेंद्र ताटके - गुंतवणूक विषयाचे अभ्यासक
वर्ष २०२५मध्ये गुंतवणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांमध्ये चांदीने इतर उमेदवारांवर मात करत प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला. एका वर्षात तब्बल १५० टक्क्यांचा परतावा मिळवून चांदीने वर्षाच्या शेवटी ‘मी पुन्हा येईन’ असा नारा लावत २०२६ साठी गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा गेल्या वर्षातील आश्वासने दिली आहेत. चांदीने २०२५ मध्ये कोणत्या आश्वासनांची पूर्तता केली होती ते पाहू या.