
‘योग्य मानसिकता’ ठेवून यशस्वी गुंतवणूकदार बना
E sakal
गायत्री जगदाळे
contact@fund-matters.com
गुंतवणूकदार म्हणून योग्य मानसिकता असेल, तर पैसे कमवणे, पैशाचे व्यवस्थापन करणे आणि सुज्ञपणे गुंतवणूक करणे सोपे आहे. तुम्ही या गोष्टी योग्यरित्या करत असाल, तर हे बजेटिंग आणि पैसे वाचवण्यासाठीदेखील लागू होते. खरे सांगायचे, तर यशस्वी गुंतवणूकदार आणि श्रीमंत व्यक्ती बनण्यासाठी योग्य मानसिकता असणे अत्यावश्यक आहे.
गुंतवणुकीचे यश हे गुंतवणूकदाराच्या आर्थिक ज्ञान किंवा साक्षरतेसोबतच मानसिकतेवर अधिक अवलंबून असते. कधीकधी गुंतवणूकदाराचा स्वतःचा स्वभाव किंवा अविचारी प्रतिक्रिया बाजारातील घसरणीपेक्षा जास्त हानिकारक असतात. म्हणूनच, गुंतवणूकदार म्हणून ही ‘योग्य मानसिकता’ असेल, तर तो यशस्वीरित्या बचत आणि गुंतवणूक करू शकतो, जास्त परतावा मिळवू शकतो आणि पैसे कार्यक्षमतेने व्यवस्थापित करू शकतो.