

Financial Planning Tips Every Doctor Should Know
E sakal
पंकज पाटील
fincircleindia@gmail.com
म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक हा संपत्तीवाढीचा एक उत्कृष्ट पर्याय असला, तरी त्यासाठी फक्त पैसे गुंतवणे पुरेसे नाही. तुमची आर्थिक स्थिती, उद्दिष्टे आणि मानसिक तयारी यांचा विचार करूनच निर्णय घेतला, तरच दीर्घकालीन लाभ मिळतो. व्यग्र वेळापत्रक, रुग्णांची जबाबदारी आणि अनिश्चित आपत्कालीन परिस्थितीत गुंतवणुकीचा विचार करणे थोडे अवघड वाटू शकते; पण योग्य पद्धतीने नियोजन केल्यास तुम्ही आर्थिक सुरक्षिततेकडे आत्मविश्वासाने वाटचाल करू शकता आणि तुमच्या रुग्णसेवेच्या प्राधान्याच्या कामावर लक्ष केंद्रित ठेवू शकता. डॉक्टरांनी म्युच्युअल फंडांमध्ये शहाणपणाने गुंतवणूक कशी करावी, याविषयी सविस्तर समजून घेऊ या.