

Sona Comstar: A Global Auto Tech Leader
Sakal
भूषण ओक - शेअर बाजार विश्लेषक
सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फोर्जिंग्ज ही ‘सोना कॉमस्टार’ याही नावाने ओळखली जाणारी एक आघाडीची भारतीय ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान कंपनी आहे. ही कंपनी उच्च अभियांत्रिकी आणि मिशन-क्रिटिकल ऑटोमोटिव्ह सिस्टिम आणि घटकांचे डिझाइन, उत्पादन आणि पुरवठा करते. तिच्या उत्पादनांमध्ये आधुनिक मोटारींमध्ये आणि रेल्वेगाड्यांसाठी लागणाऱ्या डिफरेंशियल असेंब्ली, प्रिसिजन-फोर्ज्ड गिअर्स, पारंपरिक आणि मायक्रो-हायब्रीड स्टार्टर मोटर्स, बेल्ट स्टार्टर जनरेटर सिस्टिम अशा अनेक गोष्टी समाविष्ट आहेत. कंपनी अमेरिका, युरोप, भारत आणि चीनसह जागतिक बाजारपेठांमध्ये दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी प्रवासी, व्यावसायिक आणि ऑफ रोड वाहन उत्पादकांना सेवा देते.