
जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे ग्राहक असाल आणि दररोज UPI द्वारे पेमेंट करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. SBI ची UPI सेवा २२ जुलै २०२५ रोजी मध्यरात्री काही काळासाठी बंद राहणार आहे. बँकेने स्वतः त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. SBI ने माहिती दिली आहे की, देखभालीमुळे २२ जुलैच्या रात्री UPI सेवा बंद राहतील. या काळात, ग्राहक UPI द्वारे पैसे पाठवू किंवा प्राप्त करू शकणार नाहीत.