

Why Stock Market Crash
Sakal
Share Market Close : काल झालेल्या तेजीनंतर आज गुरुवारच्या(30 ऑक्टोबर) दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण झाली. काल बाजारात चांगली वाढ झालेली. मात्र, आज ट्रम्प आणि जिनपिंग यांच्यात व्यापार चर्चा होण्याची शक्यता होती त्यामुळेच सकाळी सेन्सेक्स 247 अंकांच्या घसरणीसह तर निफ्टी 70 अंकांच्या घसरणीसह उघडला.
दिवसभर शेअर बाजार लाल रंगातच व्यवहार करत होता. शेवटी, 593 अंकांची घसरण होऊन सेन्सेक्स 84404.46 अंकांवर बंद झाला तर निफ्टी 176 अंकांच्या घसरणीसह 25,887.85 अंकांवर बंद झाला.