

Stock Market 3 November
Sakal
Stock Market Opening : भारतीय शेअर बाजाराने नोव्हेंबर महिन्याची सुरुवात घसरणीसह केली. ऑक्टोबरमधील जोरदार तेजीच्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्स आणि निफ्टी सोमवारी किंचित घसरले. सेन्सेक्स 103 अंकांच्या घसरणीसह 83,835.10 अंकांवर उघडला तर निफ्टी 26 अंकांच्या घसरणीसह 25700 च्या खाली गेला.
मात्र, बाजार सुरू झाल्यानंतर काही काळातच सकाळी 9.45 वाजता दोन्ही निर्देशांक सकारात्मक दिशेने वाढत होते. यावेळी दोन्ही निर्देशांकांत वाढ होऊन सेन्सेक्स 83,970 तर निफ्टी 25750 वर व्यवहार करत होते.