

Trading Risks in Unstable Markets
Sakal
गेल्या जवळपास दीड वर्षापासून शेअर बाजारात अनेक शेअरचे भाव हे सातत्याने खालीच येत आहेत. त्यात नववर्षाची झालेली युद्धमय सुरुवात म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. मध्यंतरी निर्देशांक टिकून असतानादेखील बहुतांश शेअर गटांगळ्या खात होते. आता इराण युद्धानंतर निर्देशांक ही गटांगळ्या खात आहे. एकूणच, सध्या सर्वच मालमत्ता विभागात अस्थिरता असल्याने, सर्वसामान्य गुंतवणूकदार चिंतेत आहे. त्यातील काही जण हे थेट शेअर बाजारात आहेत, तर काही जण म्युच्युअल फंडाद्वारे बाजारात गुंतवणूक करत आहेत. अशा वेळी आहे ती गुंतवणूक ठेवावी, कमी भावात विकावी, मंदी आहे म्हणून नवे भांडवल लावावे की काय करावे असे अनेक प्रश्न आहेत.