
संजय संघवी - संस्थापक, इंडस कॅपिटल
स्मार्ट पद्धतीने शेअर बाजारातील ट्रेंडचा फायदा घेणे महत्त्वाचे असते. बाजारातील कथानकांचा शेअरच्या कामगिरीवर मोठा प्रभाव असतो. जेव्हा एखादी थीम पकडते, मग ती संरक्षण, सेमी कंडक्टर किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता असो; त्याच्याशी संलग्न कंपन्यांच्या शेअरचे भाव आकाशाला भिडतात, उत्साही गुंतवणूकदारांच्या लाटांना ते आकर्षित करतात. हे तथाकथित ‘कथानक शेअर’ बाजारातील भावना दर्शवतात, विशेषत: ट्रेंडचा फायदा घेण्याची आशा असलेल्या किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये!