

सुपर एल निनोचा भारताच्या अर्थव्यवस्थेला धोका? पीक उत्पादन घटण्यासह महागाई वाढण्याची IMF ने वर्तवली शक्यता (AI Generated Image)
esakal
Super El Niño: सुपर एल निनोमुळे भारताच्या शेती उत्पादनावर आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) व्यक्त केली आहे. यामुळे पिकांचे उत्पादन घटणे, अन्नधान्याच्या किमती वाढणे आणि सर्वसामान्य कुटुंबांच्या खरेदी क्षमतेवर परिणाम होणे असे धोके निर्माण होऊ शकतात. मात्र, या हवामान बदलाचे परिणाम अद्याप प्रत्यक्षात दिसू लागलेले नाहीत, असे IMF ने स्पष्ट केले आहे.