म्युच्युअल फंड : ‘एसडब्ल्यूपी’ : दुधारी तलवार!

एसडब्ल्यूपीमधून नियमित उत्पन्नाची संधी; योग्य फंड, गुंतवणुकीची वेळ आणि विथड्रॉवल रेट ठरवताना जोखीम-परतावा समतोल साधणे अत्यावश्यक
Experts recommend deferred SWP and disciplined withdrawal strategies to reduce investment risk and protect capital.

Experts recommend deferred SWP and disciplined withdrawal strategies to reduce investment risk and protect capital.

Sakal

Updated on

मंगेश कुलकर्णी , ‘ॲम्फी’ नोंदणीकृत, म्युच्युअल फंड वितरक

गेल्या काही वर्षांमध्ये म्युच्युअल फंडांची लोकप्रियता वाढली आहे. एका बाजूला गुंतवणूकदारांनी नियमित गुंतवणुकीसाठी ‘एसआयपी’ला पसंती दिली, तर दुसऱ्या बाजूला म्युच्युअल फंडांमध्ये एकरकमी गुंतवणूक करून नियमित उत्पन्न मिळविण्यासाठी ‘एसडब्ल्यूपी’ म्हणजेच ‘सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन’ची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. विशेष म्हणजे मुदत ठेवींना पर्याय म्हणून ‘एसडब्ल्यूपी’कडे गुंतवणूकदर पाहात आहेत. मुदत ठेवींवर साधारण ६ ते ८ टक्के व्याज मिळते, पण मुद्दल वाढत नाही. ‘एसडब्ल्यूपी’मध्ये जोखीम आहे, पण चांगल्या फंडांमध्ये योग्य वेळी गुंतवणूक केली, तर मुदत ठेवींपेक्षा जास्त उत्पन्न मिळू शकते. अधिक उत्पन्न तर मिळतेच, पण त्याव्यतिरिक्त मुद्दलीमध्ये काही प्रमाणात वाढ होऊ शकते. ‘एसडब्ल्यूपी’च्या याच फायद्यांनी गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. मात्र, म्युच्युअल फंडांमध्ये असणाऱ्या जोखमीचा ‘एसडब्ल्यूपी’ करणाऱ्या गुंतवणूकदारांना फटका बसू शकतो. चुकीच्या वेळेला किंवा चुकीच्या फंडांमध्ये ‘एसडब्ल्यूपी’ केली, तर मुद्दलीवर नुकसान होऊ शकते. म्हणूनच ‘एसडब्ल्यूपी’ करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com