

Tax Audit Deadline for AY 2025-26
Sakal
डॉ. दिलीप सातभाई - चार्टर्ड अकाउंटंट- सीए
प्राप्तिकर कायद्यातील कलम ४४ अब अंतर्गत येणाऱ्या व्यक्तीने करनिर्धारण वर्ष २०२५-२६ शी संबंधित आर्थिक वर्ष २०२४-२५ चा कर-लेखापरीक्षण अहवाल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने १० नोव्हेंबर २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी दाखल करावा आणि करविवरणपत्र १० डिसेंबर २०२५ पूर्वी दाखल करावे, असे केंद्रीय प्रत्यक्ष करमंडळाने (सीबीडीटी) जाहीर केले आहे. अहवाल विहित मुदतीत सादर न केल्यास, कर-निर्धारण अधिकारी करदात्याच्या व्यवसायाची एकूण विक्री, उलाढाल किंवा एकूण प्राप्तीच्या अर्धा टक्का किंवा एक लाख पन्नास हजार रुपये, यापैकी कमी असलेली रक्कम दंड म्हणून आकारू शकतो. मात्र, कलम २७१ ब नुसार, वेळेत विवरणपत्र दाखल न करण्याचे योग्य कारण दिल्यास कोणताही दंड आकारला जात नाही.आता हे लेखापरीक्षण कोणी करणे आवश्यक आहे, ते जाणून घेऊ.