Premium|Financial Literacy for Kids : मुलांच्या हातात पॉकेट मनी देताय? 'या' ३ सोप्या स्टेप्स फॉलो करा आणि त्यांना बनवा भविष्यातील स्मार्ट फायनान्शिअल मॅनेजर

Money Management : घरातील आर्थिक साक्षरतेचे महत्त्व सांगताना पालकांनी मुलांशी पैशांबाबत संवाद साधणे काळाची गरज बनली असून, बचतीचे संस्कार आणि योग्य नियोजनामुळे उद्याची पिढी आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जबाबदार बनण्यास मोठी मदत होणार आहे.
Financial Literacy for Kids

Financial Literacy for Kids

esakal

Updated on

दीपाली किणीकर- kinikardeepali@gmail.com

आपण सर्व जण पैसे कमावतो, खर्च करतो आणि बचतही करतो. मात्र, याचे शहाणपण आपल्याला कुठे आणि कधी शिकायला मिळाले, असा प्रश्न अनेकांना पडतो. यावर बहुतांश लोकांचे उत्तर असते ‘अनुभवातून’. मात्र, अनेकदा हा अनुभव महागडा ठरतो. याच पार्श्वभूमीवर बालक-पालक आर्थिक संवाद ही काळाची गरज बनली आहे.

पवन हा बारा वर्षांचा हुशार मुलगा होता. त्याला चॉकलेट, गोळ्या आणि जंक फूड खायची खूप आवड होती. शाळेतून आल्यावर किंवा बाजारात गेल्यावर तो नेहमीच वडिलांकडे पैसे मागायचा आणि हट्ट धरायचा. सुरुवातीला वडील हसून पैसे द्यायचे; पण पवनचा हट्ट वाढतच चालला होता. एके दिवशी वडील त्याला जवळ बसवून शांतपणे म्हणाले, ‘‘पवन, हे सारखं बाहेरचं खाणं चांगलं नाही. यामुळे फक्त आरोग्यच बिघडत नाही, तर पैसेही वाया जातात.’’ थोडं थांबून ते पुढे म्हणाले, ‘‘मला एक कल्पना सुचली आहे. तू चॉकलेट, गोळ्या आणि जंक फूडसाठी जे पैसे मागतोस, ते आपण साठवूया. काही दिवसांनी त्या पैशांतून तुला एक रिमोट कंट्रोल कार घेऊया. काय म्हणतोस?’’ हे ऐकताच पवनच्या चेहऱ्यावर हसू फुलले. त्याला रिमोट कंट्रोल कार खूप आवडायची. तो लगेच विचारू लागला, ‘‘खरंच बाबा? आपण ती घेऊ शकू का?’’ वडील हसत म्हणाले, ‘‘नक्कीच! पण त्यासाठी तुला संयम ठेवावा लागेल आणि पैसे साठवावे लागतील.’’ त्या दिवसापासून पवनने चॉकलेट, गोळ्या आणि जंक फूड कमी खायला सुरुवात केली. रोजचे थोडेथोडे पैसे तो एका छोट्या डब्यात टाकू लागला. दररोज तो डबा उघडून पैसे मोजताना त्याला खूप आनंद व्हायचा. काही आठवड्यांनी डबा भरला. वडील आणि पवन दोघेही दुकानात गेले आणि पवनने स्वतः साठवलेल्या पैशांतून सुंदर रिमोट कंट्रोल कार विकत घेतली. त्या दिवसापासून पवनला पैशांची खरी किंमत कळली आणि तो अधिक समजूतदार झाला. आजची पिढी स्मार्टफोन, ऑनलाइन शॉपिंग, यूपीआय, गेमिंग आणि जाहिरातींच्या प्रभावाखाली वाढत आहे. मात्र, पैशाचे मूल्य आणि त्याची जबाबदारी याची ओळख त्यांना फारशी करून दिली जात नाही. ‘मुले लहान आहेत’, ‘त्यांना समजणार नाही’, अशा समजुतींमुळे पालक अनेकदा पैशांबद्दल बोलणे टाळतात.

Financial Literacy for Kids
Sangli Leopard Menace : बिबट्या घरात घुसण्यामागचं वास्तव काय? वाढती दहशत, कारणं आणि ठोस उपाय
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com