Telangana Election: तेलंगणाच्या प्रचारात मुख्यमंत्र्यांची इंदिरा गांधींवर टीका, पंतप्रधान मोदींना देखील धरले धारेवर..

‘‘तेलंगणमध्ये तांदळाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली
Telangana Chief Minister K. Chandrasekhar Rao
Telangana Chief Minister K. Chandrasekhar Raoesakal

मानकोंडूर (तेलंगण) : ‘‘तेलंगणमध्ये तांदळाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, तेलंगणमध्ये पुन्हा सत्तेत आल्यास राज्यात सर्वत्र अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करण्यात येतील या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल,’’ असे आश्‍वासन तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी सोमवारी करीमनगर जिल्ह्यातील मानकोंडूर येथे आयोजित सभेत दिले आहे.

राज्यात पुन्हा सत्ता आल्यास रिक्षाचालकांकडून प्रतिवर्षी ‘तंदुरुस्ती प्रमाणपत्र’घेण्याची पद्धत बंद करण्यात येईल, असे आश्‍वासनही राव यांनी दिले आहे. केसीआर यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली आहे. काँग्रेसने १९५०मध्ये तेलंगणमधील जनतेच्या इच्छेविरुद्ध तेलंगण राज्य आंध्र प्रदेशात विलीन केले, असा आरोप केसीआर यांनी केला. त्याचप्रमाणे राव यांनी पुन्हा एकदा इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळावर टीका केली आहे.

तेलंगणसह संयुक्त आंध्र प्रदेश असताना एन.टी. रामाराव मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी गरिबांसाठी अवघ्या दोन रुपयांत तांदूळ द्यायला सुरूवात केली. तोवर येथील नागरिकांची मोठ्याप्रमाणात उपासमार होत होती असा दावाही राव यांनी केला आहे.

Telangana Chief Minister K. Chandrasekhar Rao
Hair Care Tips : हिवाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी 'या' गोष्टीचा करा वापर, केसांना मिळतील फायदे

केसीआर म्हणाले पंतप्रधानांनी तेलंगणमध्ये एकही नवोदय विद्यालय आणि नवे वैद्यकीय महाविद्याल सुरू करण्यास परवानगी दिली नाही.‘बीआरएस’च्या धोरणांमुळे प्रतिवर्षी तीन कोटी टन तांदळाचे उत्पादन, तांदळाच्या खरेदीसाठी सात हजार ५०० केंद्रांची स्थापना प्रसंगी नुकसान सहन करूनही सरकारची शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी पुन्हा सत्ता मिळाल्यास रायथू बंधू योजना सुरूच ठेवणार, त्यासाठीच्या निधीतही वाढ करणार, शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विजेवर मीटर बसविण्यास नकार दिल्याने केंद्राने निधी दिला नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com