

India share buyback tax policy changes
esakal
कंपन्यांकडून शेअरची पुनर्खरेदी (बायबॅक) ही संकल्पना भारतीय भांडवली बाजारात नवी नाही. अतिरिक्त रोख रक्कम उपलब्ध असलेल्या कंपन्या आपल्या शेअरधारकांना थेट लाभ देण्यासाठी किंवा भांडवली रचना अधिक कार्यक्षम करण्यासाठी ‘बायबॅक’चा मार्ग निवडतात. मात्र, गेल्या काही वर्षांत शेअर बायबॅकवरील करप्रणाली इतकी किचकट झाली होती, की हा पर्याय लाभांशापेक्षा करदृष्ट्या कमी आकर्षक ठरू लागला होता. आता, केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये शेअर बायबॅकच्या करप्रणालीत एक मूलभूत आणि दूरगामी बदल प्रस्तावित केला आहे. या बदलामुळे सर्वसामान्य आणि बिगर-प्रवर्तक शेअरधारकांना मोठा दिलासा मिळणार असला, तरी प्रवर्तक शेअरधारकांसाठी ‘बायबॅक’ हा कर-कार्यक्षम पर्याय राहिलेला नाही, हे स्पष्ट होत आहे.