

SE Quality Index performance
esakal
एसई गुणवत्ता निर्देशांकाची पहिली आकडेवारी १६ सप्टेंबर २००५ रोजीची असून, ती १०० असे गृहीत धरून विचार केला, तर २० वर्षांत १९ पट भांडवलवृद्धी ही निश्चितच आकर्षक भांडवलवृद्धी आहे. दरवर्षी मार्च आणि सप्टेंबर या महिन्यात या निर्देशांकात फेरबदल केले जातात. या निर्देशांकातील प्रत्येक शेअरचे स्थान किती आहे, याचे मोजमाप करण्यासाठी एक वेगळी पद्धत वापरली जाते; अर्थातच, ही पद्धत याच निर्देशांकासाठी आवश्यक आहे. कारण निर्देशांकाचे नाव ‘गुणवत्ता निर्देशांक’ आहे.