

Women Rights and Laws
esakal
दरवर्षीप्रमाणे यंदाही आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा झाला. महिलांचे सत्कारसोहळे, समारंभ साजरे झाले. मात्र, महिलांच्या खासगी आयुष्याचे संरक्षण करणारा एक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ही बाब महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय मोलाची आहे. ‘सकाळ मनी’च्या माध्यमातून दरवर्षी महिलांची आर्थिक साक्षरता आणि आर्थिक सुरक्षितता यांसंदर्भातील विविध विषयांवर चर्चा केली जाते. फसवणूक किंवा त्रास, तो आर्थिक असो वा इतर कोणत्याही प्रकारचा त्याला आळा घालण्यासाठी कायदेशीर तरतुदींची माहिती असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाची सविस्तर माहिती घेऊ या.
फसवणूक किंवा त्रास, तो आर्थिक असो वा इतर कोणत्याही प्रकारचा यामागे अनेकदा मानवी अहंकार (इगो) कारणीभूत असतो. काही वेळा ‘व्हिक्टिम कार्ड’ खेळून समोरच्याला नामोहरम करण्याचाही प्रयत्न केला जातो. आजकाल यासाठी मोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मोबाईल फोन आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. ‘It is the finger that pulls the