
वैभव कुलकर्णी - ‘ॲम्फी’ नोंदणीकृत म्युच्युअल फंड वितरक
आपल्या आजूबाजूचे जग सतत बदलत आहे. तंत्रज्ञान, ग्राहकांची आवड आणि जागतिक प्राधान्यक्रमाच्या गोष्टी यामध्ये सतत बदल होत असतो. हुशार गुंतवणूकदार हे बदल लवकर ओळखतात, त्यामध्ये वेळेआधी गुंतवणूक करतात आणि नवी संकल्पना मुख्य प्रवाहात येण्याआधीच मोठ्या नफ्याचा लाभ घेतात. हीच थीमॅटिक गुंतवणुकीची संकल्पना आहे. ही एक दूरदृष्टी असलेली गुंतवणूक पद्धत आहे, जी वाढण्याची शक्यता असलेले कल ओळखते आणि त्याचा फायदा घेऊ शकणाऱ्या मजबूत मूलभूत गोष्टी असलेल्या व्यवसायांची निवड केली जाते.