

मुकुंद लेले - mukundlelepune@gmail.com
‘थिं क अँड ग्रो रिच’ (Think and Grow Rich) हे नेपोलियन हिल यांनी लिहिलेले पुस्तक केवळ आर्थिक श्रीमंती मिळविण्याचे साधन नसून, ते वैयक्तिक विकासाचे एक उत्कृष्ट शास्त्र सांगते. १९३७ मध्ये प्रकाशित झालेले हे पुस्तक आजही तितकेच प्रभावी आहे. या पुस्तकाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या आराखड्यानुसार, जगातील अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये प्रशिक्षण दिले जाते, जेणेकरून कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक बदल घडून कंपनीच्या उद्दिष्टपूर्तीबरोबरच वैयक्तिक उन्नतीही होताना दिसते. आपले विचार बदलून, सातत्यपूर्ण कृती केली, तर श्रीमंत होणे अवघड नाही, हे या पुस्तकातील अनेक उदाहरणांवरून लक्षात येते. या पुस्तकातील विचारांना ‘एपी ग्लोबाले’चे अध्यक्ष आणि ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी सद्गुरू श्री बालाजी तांबे यांच्या ‘लाइफ इन बॅलन्स’ अर्थात ‘एलआयबी’तील तत्त्वांची जोड देऊन एक वेगळे मॉडेल विकसित केले आहे. यानिमित्ताने त्यांच्याशी केलेल्या बातचितीचा सारांश.