Premium|Third Mumbai : मुंबईपलीकडे घरबांधणीचा विस्तार; तिसरी मुंबई आणि पालघरकडे वाढता कल

Mumbai Real Estate and Third Mumbai : मुंबईतील पुनर्विकासासोबत अटल सेतू, नवी मुंबई विमानतळ परिसरातील तिसरी मुंबई आणि पालघर घरबांधणीची नवी केंद्रे ठरण्याची शक्यता आहे. पायाभूत सुविधा आणि वाहतूक नियोजनाला विशेष महत्त्व मिळणार आहे.
Mumbai Real Estate and Third Mumbai

Mumbai Real Estate and Third Mumbai

esakal

Updated on

विमलेंद्र सिंह

मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासह क्लस्टर पुनर्विकासाला वेग येत असून, अटल सेतू आणि नवी मुंबई विमानतळाच्या परिसरात विकसित होत असलेली ‘तिसरी मुंबई’ हे घरबांधणीचे पुढील महत्त्वाचे केंद्र ठरण्याची शक्यता आहे. त्यानंतर पालघर विभागातही पायाभूत सुविधांच्या विकासामुळे घरबांधणीला चालना मिळेल. दरम्यान, वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी दीर्घकालीन नियोजन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि रस्ते पायाभूत सुविधांचा विस्तार आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर, ‘महिंद्रा लाइफस्पेसेस’चे मुख्य व्यवसाय अधिकारी (निवासी प्रकल्प) विमलेंद्र सिंह यांची मुंबई ‘सकाळ’चे उपमुख्य वार्ताहर

कृष्ण जोशी यांनी खास ‘सकाळ मनी’साठी घेतलेली ही मुलाखत...

प्रश्न : महामुंबईचा विचार करता घरबांधणीचा केंद्रबिंदू सध्या कोठे आहे? यापुढे घरबांधणीची नवी केंद्रे कोठे, कशी आणि किती वेळात विकसित होतील?

विमलेंद्र सिंह : मोठ्या प्रमाणावरील घरबांधणीचा केंद्रबिंदू आता मुंबई शहर राहिलेला नाही. उलट तो मुंबईच्या बाहेर, किंबहुना नवी मुंबईच्याही पलीकडे, अटल सेतूच्या पलीकडे विकसित होत असलेल्या तिसऱ्या मुंबईकडे आणि त्यानंतर पालघरकडे हळूहळू सरकेल. किंबहुना मुंबईतील हा केंद्रबिंदू आता अन्यत्र सरकावा आणि त्याचा विस्तार व्हावा, हा सरकारचाही प्रयत्न आहे. मुंबईत आता फारशा मोकळ्या जमिनी उरलेल्या नाहीत. त्यामुळे सध्या केवळ मोकळ्या सरकारी जमिनींवरच घरबांधणीला वाव आहे. त्याचबरोबर एसआरए, म्हाडा आणि ‘एमएमआरडीए’च्या जमिनींवर क्लस्टर पुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबईची उभी वाढ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ३०-४० वर्षे जुन्या इमारतींचा पुनर्विकास अत्यावश्यक आहे. त्यातच आता क्लस्टर पुनर्विकास हा प्रकार अत्यंत लोकप्रिय होत आहे. जुन्या पुण्यातही आता पुनर्विकास सुरू झाला आहे. वाशी-नवी मुंबईपर्यंत पुनर्विकासाचे वारे सुरू झाले आहेत. सध्याच्या स्थितीत आणखी २० वर्षे तरी पुनर्विकासाचे चक्र सुरू राहील. त्यात सर्वांसाठी मोठी संधी आहे. आता नवी मुंबईच्या पुढे अटल सेतू आणि नवी मुंबई विमानतळाच्या जवळ तिसरी मुंबई उभी राहत आहे. सरकारने आधीच तिथे पायाभूत सुविधांची निर्मिती सुरू केली आहे. सर्व उड्डाणपूल सुरू झाल्यावर मुंबईतून तिथे ४० मिनिटांत जाता येईल. या परिसरात नव्या कंपन्या, स्टार्ट-अप, माहिती-तंत्रज्ञान केंद्रे आणि शिक्षण संकुले येत आहेत. त्यातल्या त्यात निम्नस्तरीय नोकऱ्या करणाऱ्यांना तिसऱ्या मुंबईत घर घेणे परवडणारे आहे. त्यामुळे ही तिसरी मुंबईदेखील चार-पाच वर्षांत आकाराला येईल. त्यानंतर पालघर क्षेत्रावर सर्वांचा भर राहील. अर्थात, पालघरच्या तुलनेत तिसरी मुंबई लवकर विकसित होईल. कारण तिसरी मुंबई ही पुणे, मुंबई-नवी मुंबई आणि अलिबाग या औद्योगिक त्रिकोणाच्या मध्यभागी आहे. त्यामुळे हा फायदा त्या क्षेत्राला मिळेल. मुंबईतील पायाभूत सुविधांचे चक्रही आता पूर्ण होत आहे. घरापासून कामाच्या ठिकाणापर्यंत एका तासात पोहोचविण्याची घोषणा ‘एमएमआरडीए’ने केली आहे. या सर्व बाबी बांधकाम व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि आवश्यक आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com