
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. यामुळे सोन्याची किंमत लवकरच १ लाख रुपयांच्या पातळीवर पोहोचेल असा अंदाज वर्तवला जात आहे. त्याची चिन्हे देशाच्या वायदा बाजारात आणि दिल्लीच्या सराफा बाजारात स्पष्टपणे दिसून आली. देशातील वायदा बाजारात सोन्याचे भाव ९१,४०० रुपयांच्या पुढे गेले आहेत.