

Big Blow for Drivers: New Traffic Challan Rules Make 50% Fine Payment Mandatory
eSakal
Traffic Challan Rules: देशभरात वाहतूक नियम मोडणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही वाहतुकीचे नियम तोडून त्यावरील चलन(e-Challan) सरळ लोकअदालतीत जाऊन माफ करून घेण्याचा विचार करत असाल तर ते आता शक्य होणार नाही. आता लोकअदालतीत जाण्यासाठी तुम्हाला आधी चलानाच्या एकूण दंडापैकी किमान 50 टक्के दंड भरावा लागणार आहे.