Government Loan Scheme for Women
Sakal
Udyogini Scheme : गेल्या काही वर्षांत पाहिले तर नोकरीपासून ते व्यवसाय क्षेत्रात महिलांची सहभागिता झपाट्याने वाढताना दिसत आहे. भारतातील सुमारे 20 टक्के व्यवसाय महिला चालवतात. अलीकडील एका अहवालानुसार, भारतामध्ये कर्ज घेणाऱ्या महिलांची संख्या गेल्या पाच वर्षांत 22% वार्षिक दराने वाढली आहे, आणि यात बहुसंख्य महिला लहान शहरं व ग्रामीण भागातील आहेत. या महिलांना आणखी आर्थिक बळ मिळावे म्हणून सरकारने उद्योगिनी योजना सुरू केलेली आहे.