

Aadhaar Card Update Fees Increased from November 1 : आधारकार्ड बाबत आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. १ नोव्हेंबर पासून आधारकार्ड अपडेट करण्यासाठीच्या लागणाऱ्या शुल्कांमध्ये वाढ होत आहे. आधार कार्डबाबतच्या विविध कामांसाठी वेगवेगळे शुल्क असणार आहे आणि ते किती असेल हे जाणून घेऊया.
UIDAI च्या नवीन नियमांनुसार, १ नोव्हेंबरपासून, आधार कार्डवरील तुमचे नाव, पत्ता किंवा मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी ७५ रुपये खर्च येणार आहे. जर तुम्हाला तुमचे फिंगरप्रिंट, बुबुळ किंवा फोटो अपडेट करायचा असेल तर शुल्क १२५ रुपये असेल. तर ५ ते ७ आणि १५ ते १७ वयोगटातील मुलांसाठी बायोमेट्रिक अपडेट पूर्णपणे मोफत असतील.
ऑनलाइन कागदपत्र अपडेट सुविधा सध्या १४ जून २०२६ पर्यंत मोफत आहे. मात्र त्यानंतर, केंद्रावर या सेवेसाठी ७५ शुल्क आकारले जाईल. आधार कार्ड रिप्रिटींगसाठी ४० आणि घर नोंदणी सेवांसाठी पहिल्या व्यक्तीसाठी ७०० रुपये. त्याच पत्त्यावर प्रत्येक अतिरिक्त व्यक्तीसाठी ३५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
नवजात मुलांसाठी आधार कार्ड मोफत असतील. आधार कार्ड जारी केल्यानंतर त्यांचे नाव, पत्ता, बायोमेट्रिक्स किंवा इतर तपशील अपडेट करणाऱ्यांना हे शुल्क लागू होते. नवजात बाळाचे आधार कार्ड जारी केल्यानंतर, पाच वर्षांच्या वयात बायोमेट्रिक अपडेट आवश्यक असते. त्यानंतरचे अपडेट ५ ते ७ वर्षे आणि १५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांना आवश्यक असतात.
याचबरोबर भारत सरकारने नागरिकांसाठी आधार कार्ड मिळवण्याची प्रक्रिया आणखी सोपी केली आहे. आता तुम्ही व्हॉट्स अॅपवरून MyGov Helpdesk चॅटबॉटद्वारे काही मिनिटांतच तुमचे आधार कार्ड पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करू शकता. देशातील सर्वात महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक असलेल्या आधार कार्डची ही सुविधा कोट्यवधी व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.