

Aadhaar Card Rules UIDAI
ESakal
प्रत्येक भारतीयासाठी सर्वात महत्त्वाचा ओळखपत्र बनलेला आधार कार्ड आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल घडवून आणणार आहे. केंद्र सरकार आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) लवकरच तुमच्या आधार कार्डवरून तुमचा पत्ता किंवा जन्मतारीख काढून टाकणारी प्रणाली लागू करण्याची तयारी करत आहेत. येत्या काही दिवसांत आधार कार्डचे स्वरूप पूर्णपणे बदलेल. आता त्यावर फक्त तुमचा फोटो आणि QR कोड दिसेल.