

A Capital Gain Statement helps investors accurately report gains from mutual funds and shares while filing their income tax returns.
Sakal
सुहास राजदेरकर, ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार
दरवर्षी ३१ जुलै जवळ येऊ लागला, की बहुतेकांना प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) भरण्याचे वेध लागतात. नोकरदार मंडळींना पूर्वी फक्त फॉर्म नंबर १६, सीएकडे दिला, की निश्चिंती असायची. परंतु, भांडवली लाभाकडे बहुतेकांचे दुर्लक्ष असायचे. आता पॅनवरून प्रत्येक व्यवहाराची नोंद होत असल्याने भांडवली लाभावरील योग्य कर (कॅपिटल गेन टॅक्स) भरणे महत्त्वाचे ठरते. तुम्ही शेअर, म्युच्युअल फंड, घर आदी विकले असेल आणि त्यावर भांडवली लाभ झाला असेल, तर कर भरावा लागतो. आजकाल बहुतेक जण म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांमध्ये पैसे गुंतवतात आणि वेळोवेळी जसे लागतील, तसे पैसे काढतात किंवा फायदा काढून घेतात किंवा, तसे केले नाही आणि गुंतवणूक दीर्घकाळासाठी केली असेल, तरीही ‘एसटीपी’ अर्थात ‘सिस्टिमॅटिक ट्रान्स्फर प्लॅन’ खूप प्रचलित आहे. यामध्ये प्रथम लिक्विड योजनेमध्ये पैसे गुंतवून ते रोज किंवा आठवड्याला किंवा महिन्याला आपोआप इक्विटी योजनेमध्ये हस्तांतरित केले जातात. अशावेळी, लिक्विड योजनेमध्ये तुम्हाला हमखास भांडवली लाभ होतो आणि त्यावर कर द्यावा लागतो. सध्याच्या प्राप्तिकर नियमांनुसार एका आर्थिक वर्षामध्ये १,२५,००० रुपयांपर्यंतचा दीर्घकालीन भांडवली लाभ करमुक्त आहे. परंतु, त्यानंतरच्या लाभावर; तसेच अल्पावधीसाठीच्या भांडवली लाभावर कर लागतो.