
Union Budget 2025 Marathi News : केंद्रीय अर्थसंकल्प आज जाहीर झाला, यामध्ये सर्वात महत्वाची घोषणा करण्यात आली ती म्हणजे १२ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे. त्यामुळं मध्यमवर्गासाठी ही सर्वात मोठी घोषणा असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर इतर सर्वच क्षेत्रांसाठीही तरतूदींचा या बजेटमध्ये समावेश आहे.
यांपैकी कृषी क्षेत्रासाठी सरकारनं काही घोषणा केल्या आहेत. पण शेतकऱ्यांसाठी हे बजेट खऱंच लाभदायक आहे का? तर नाही! असं म्हटलंय स्वराज इंडिया पक्षाचे प्रमुख आणि कार्यकर्ते योगेंद्र यादव म्हटलंय. त्यासाठी काही निकषही सांगितले आहेत.