Union Budget 2026
esakal
Sakal Money
Union Budget 2026 : नारळ, काजू लागवडीला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा निर्णय; अर्थसंकल्पात कोणती केली घोषणा?
Government Focus on High-Value Crops in Union Budget 2026 : अर्थसंकल्प २०२६ मध्ये चंदन, नारळ, काजू, बदाम व शेंगदाण्याच्या लागवडीला चालना देत कृषी उत्पन्न, रोजगार आणि निर्यात वाढवण्यावर भर देण्यात आला आहे.
Union Budget 2026 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज रविवारी देशाचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. हा त्यांचा सलग नववा अर्थसंकल्प असून, सलग नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत. २०१९ पासून त्यांनी पूर्ण तसेच अंतरिम अर्थसंकल्प सादर करत संसदीय इतिहासात नवा विक्रम नोंदवला आहे.
