
देशातील तरुण आणि मध्यमवर्गीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, १ जुलै २०२५ रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रोजगाराशी संबंधित प्रोत्साहन (ELI) योजनेला हिरवा कंदील देण्यात आला आहे. या योजनेचे उद्दिष्ट देशातील नोकऱ्यांना प्रोत्साहन देणे आणि विशेषतः उत्पादन क्षेत्राला बळकटी देणे आहे. सरकारने या योजनेसाठी १.०७ लाख कोटी रुपयांचे मोठे बजेट देखील ठेवले आहे.