

Gold Investment
esakal
भारत हा जगातील दुसरा सर्वांत मोठा सोने आयातदार देश आहे. भारतीयांचे सोनेप्रेम सर्वश्रुत आहे. सोने हा पारंपरिक सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानला जातो. भारतीय संस्कृतीत सोने हे शुभमुहर्तावर खरेदी करण्याची परंपरा आहे. त्यामुळे भारतीयांकडे लाखो टन सोने साठलेले आहे. अडचणीच्या प्रसंगी सोने विकून रोख रक्कम उभी करता येते. आज आधुनिक युगातही सोन्याचा हा उपयोग कायम आहे. आजकाल बँका, वित्तीय संस्था सोनेतारण ठेवून कर्ज देतात. त्यामुळे वेळप्रसंगी सोने नेहमीच कामाला येऊ शकते. बदलत्या काळानुसार या पारंपरिक संपत्तीच्या वापराकडे आता नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.