

MDR on UPI transactions over 2000 deferred
esakal
UPI Payment Charges : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) महत्त्वाचा निर्णय घेतला असून, दिवाळीच्या तोंडावर UPI पेमेंट करणाऱ्यांना दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने घोषणा केल्याप्रमाणे २ हजार रुपयांहून अधिक रकमेच्या व्यापारी व्यवहारांवर लागू होणारे ०.४ टक्के शुल्क आता दिवाळीनंतर लागू होणार आहे. १५ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होणारे मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) शुल्क आता दिवाळीनंतर लागू करण्यात येणार आहे. सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंट आणि खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर परिणाम होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.