UPI payment charges above 2000 rupees
esakal
दोन हजार पेक्षा जास्त UPI पेमेंट केल्यास आता अतिरिक्त शुल्क भरावं लागणार, अशा पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यामुळे अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, प्रत्यक्षात सामान्य UPI वापरकर्त्यांनी घाबरण्याचं कारण नाही. केंद्र सरकारने संसदेत मांडलेल्या 'पेमेंट आणि सेटलमेंट प्रणाली (दुरुस्ती) विधेयक २०२७'मध्ये मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) लागू करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र हा प्रस्ताव सर्वसामान्य ग्राहकांसाठी नसून मुख्यतः व्यापारी व्यवहारांशी संबंधित आहे.