

US Fed Holds Rates Steady: What It Means for Indian Stock Market and Gold
eSakal
US Fed Meeting Interest Rate : अपेक्षेप्रमाणेच अमेरिकेच्या फेडरल ओपन मार्केट कमिटीने (FOMC) 28 जानेवारीला झालेल्या बैठकीत व्याजदरांबाबत 'जैसे थे' धोरण कायम ठेवले. गेल्या वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर या सलग तीन बैठकींमध्ये दरकपात केल्यानंतर यावेळी कोणताही बदल करण्यात आला नाही. फेडने व्याजदर 3.50% ते 3.75% च्या दरम्यान कायम ठेवला असून, ही पातळी 2022 नंतरची सर्वात नीचांकी आहे.