

Outstanding Toll Payment
ESakal
जर तुमच्या वाहनावर टोल कर थकबाकी असेल, तर कोणतेही महत्त्वाचे सरकारी काम आता सोपे राहणार नाही. केंद्र सरकारने मोटार वाहन नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे. ज्यामध्ये स्पष्ट केले आहे की, टोल देयके भरेपर्यंत वाहनांशी संबंधित अनेक कामे थांबवली जातील. सरकारने केंद्रीय मोटार वाहन (दुसरी सुधारणा) नियम, २०२६ लागू केले आहे. त्याचा उद्देश राष्ट्रीय महामार्गांवर टोल वसुली मजबूत करणे आणि टोल चोरी रोखणे आहे.