

Virat Kohali
Sakal
Virat Kohli Investment : क्रिकेटच्या मैदानावरील किंग विराट कोहली आता आपल्या स्पोर्ट्स व्यवसायाच्या नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. मागील जवळपास आठ वर्षे जागतिक स्पोर्ट्सवेअर ब्रँड पूमा (Puma) सोबतची भागीदारी संपवत भारतीय क्रिकेट सुपरस्टारने आता देशातीलच स्पोर्ट्स फूटवेअर उत्पादन कंपनी 'अॅजिलिटास स्पोर्ट्स' (Agilitas Sports) सोबत हातमिळवणी केली आहे. कोहलीने त्याचा स्पोर्ट्सवेअर आणि अॅथलीझर ब्रँड 'वन8'(one8) अॅजिलिटास स्पोर्ट्सला विकण्याचा निर्णय घेतला आहे.