

India’s Rich Are Spending on Experiences, Not Just Luxury Products: Visa Report
eSakal
Visa Report On Spending: भारतातील श्रीमंत वर्गाच्या खर्चाच्या पद्धतीत मोठा बदल होत असल्याचा खुलासा Visa च्या नव्या अहवालातून झाला आहे. आता केवळ महागड्या वस्तू खरेदी करण्यापेक्षा खास अनुभव, प्रीमियम सेवा आणि वेळ वाचवणाऱ्या सुविधांवर श्रीमंत ग्राहक अधिक खर्च करत असल्याचे या अभ्यासात समोर आले आहे. Visa Consulting and Analytics (VCA) ने प्रसिद्ध केलेल्या 'India’s Affluent Economy 2025-26' या व्हाईटपेपरमध्ये भारतातील वाढत्या श्रीमंत वर्गाच्या जीवनशैली आणि खर्चाच्या बदलत्या ट्रेंडचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे.